निसर्ग अन आजचे भयान वास्तव
निसर्ग हा खुप मोठा गुरु व आनंद देणारा सखा, पथदर्शक आहे. तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाने कितीही प्रगत व्हाल. पण तुम्ही निसर्गापुढे नेहमी खुजेच राहणार. निसर्गचा व ह्या वसंधुरेचा आनंद ही तुम्ही नित्तीमत्तेनेच घ्या व ते जपा संवर्धित करा. पण जर तुम्ही ते ओरबाडायाचा प्रयत्न केलात तर निसर्ग ही त्याचे रौद्र रुप दाखवतोच. सुनामी, भुकंप, आताचा कोरोना आदी सारखे, ही त्याचीच रुपे. निसर्गाच्या रौद्रतेपुढे सर्व हतबल होतात. व त्यात काही दुष्टांमुळे विनादोषीही हकनाक बळी जातात. आजच्या परिस्थितीत विकासाच्या नावाखाली हजोरो जंगले तोडली जातात. जल-वायु प्रदुषण केले जाते. वणवे लावले जातात. डोंगरांना सुरूंग लावले जातात. असंख्य दुर्मिळ वन्यजिवांची कत्तल केली जाते. काय हा प्रगतिशल माणुस आहे? काय हा विकास आहे?? तर नक्कीच नाही... हे तर ह्या वसुंधरेला ओरबाडायचा प्रयत्न आहे... सुधरे रे बुद्धी असलेल्या निर्बुद्धी सारख वागणार्या मानवा. निसर्गाचा ह्या वसुंधरेचा योग्य तो मान ठेव नाय तर तुझा विनाश अटळ आहे. आपण झाडे लावतो. पण ते जगले का? वाढले का याची काळजी घ...